यवतमाळ- विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री मदन येरावार यांचा विजय झाला. अत्यंत चुरशीची असणारी ही लढत येरावर यांनी 2 हजार 150 मतांनी जिंकली. यवतमाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये पालक मंत्री मदन येरावार आणि काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यासोबतच शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे रिंगणात होते.
यवतमाळमधील चुरशीच्या लढतीत मदन येरावार यांचा विजय
अत्यंत चुरशीची असणारी ही लढत येरावार यांनी 2 हजार 150 मतांनी जिंकली. यवतमाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये पालक मंत्री मदन येरावार आणि काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यासोबतच शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे रिंगणात होते.
मदन येरावार यांचा विजय
मतमोजणीच्या सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर हे आघाडीवर होते. 23 व्या फेरीपर्यंत काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी आठ हजाराची आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर जोरदार मुसंडी मारत पालक मंत्री मदन येरावार यांनी आघाडी मोडीत काढत तिसाव्या फेरीअखेर काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांच्यावरती 2150 मतांनी विजय संपादित केला.