यवतमाळ -जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचारी हा दर्जा देऊन सेविकांना तृतीय व मदतनिसांना चतुर्थ श्रेणीचे वेतन द्यावे, अशा काही प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या ;
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचारीचा दर्जा द्यावा
- सेविकांना तृतीय व मदतनिसांना चतुर्थ श्रेणीचे वेतन, भत्ते, सेवेचे फायदे तसेच महिन्याला किमान वेतन देण्यात यावे
- सप्टेंबर २०१८ पासून मध्यवर्ती सरकारची मानधनवाढीची रक्कम फरकासहित देण्यात यावी
- सेवानिवृत्तीच्या वेळी मिळत असलेल्या मानधनाची ५० टक्के रक्कम पेंशन म्हणून देण्यात यावी
- जुन महिन्याच्या मानधनाची रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊन त्यांची व त्यांच्या कुटूंबीयांची होत असलेली उपासमार थांबविण्यात यावी