'आत्मक्लेष अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या', चिलगव्हाण येथील नागरिकांची मागणी - यवतमाळची सामुहिक आत्महत्या
चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबीयांसमवेत पहिली सामुहिक आत्महत्या केली होती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षीच्या अन्नत्याग आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.
साहेबराव करपे
यवतमाळ - जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे 19 मार्च 2021ला एक दिवसीय आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. या अंहिसात्मक आंदोलनाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी चिलगव्हाण येथे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.