यवतमाळ - जिल्ह्यातील एका गोट फार्ममध्ये धाडसी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 5 ते 6 दरोडेखोरांनी संबंधितावर कुऱ्हाडीने वार करुन 9 बोकड 8 शेळ्या व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 57 हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना पुसद तालुक्यातील देवठाणा घडली आहे.
आकाश विलास चव्हाण (24 रा. दुधागिर तांडा, देवठाणा ता. पुसद) असे तक्रारदाराचे नाव आहे. घटनेनंतर त्यांनी खंडाळा पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रितसर तक्रार दिली आहे. देवठाणा येथील विश्वनाथ सुका राठोड यांच्या शेतात गोट फार्ममध्ये काम करतात. 22 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास गोट फॉर्ममध्ये कुत्री भुंकण्याचा आवाज आला. दरम्यान आकाश गेट उघडून बाहेर आले तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. तसेच धाक दाखवून गोट फार्ममधील 9 बोकड 8 शेळ्या व मोबाइल असा एकूण 1 लाख 57 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित अजय ऊर्फे गोलु प्रकाश चव्हाण ( 22, रा. जामवाडी, फुलवाडी ता. पुसद) व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कुर्हाडीने वार करत दीड लाखांचा मुद्देमाल लंपास; देवठाणामधील घटना - दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
देवठाणा येथील विश्वनाथ सुका राठोड यांच्या शेतात गोट फार्ममध्ये काम करतात. 22 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास गोट फॉर्ममध्ये कुत्री भुंकण्याचा आवाज आला. दरम्यान आकाश गेट उघडून बाहेर आले तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले.
खंडाळा