महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाभूळगाव नगरपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा; नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला 'बेशरम'चे झाड भेट

मागील कित्येक दिवसांपासून प्रभागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, नगरपंचायत मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नगरपंचायतीवर घागर घेऊन मोर्चा काढला.

यवतमाळ

By

Published : Jun 20, 2019, 9:50 AM IST

यवतमाळ- बाभूळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11, 13, 14 मध्ये मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. तो सुरळीत होण्यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आले. मात्र, याची दखल न घेतल्याने महिलांनी नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढून नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमाचे झाड भेट दिले.

बाभूळगाव नगरपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा; नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला 'बेशरम'चे झाड भेट

मागील कित्येक दिवसांपासून प्रभागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, नगरपंचायत मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नगरपंचायतीवर घागर घेऊन मोर्चा काढला. तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला बेशरमाचे झाड भेट दिले. यावेळी पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा महिलांनी दिल्या.

बाभूळगाव नगरपंचतात ही पहिली भाजपच्या ताब्यात होती. त्यानंतर काँग्रेस नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाल्याने अपक्ष नगरसेवक सध्या नगराध्यक्षपदी विराजमान आहे. त्यानंतर राजकीय पक्षामधील गटबाजीमुळे नगरपंचायतीच्या विषय समित्या बनू शकल्या नाहीत. यामुळे शहराला पाणीपुरवठा होत नसल्याचे आंदोकल महिलांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details