यवतमाळ - राज्यात एकीकडे मुंबईची तुंबई होताना दिसत आहे. तर दुसरीकडे विदर्भाचा काही भाग आणि लगतच्या मराठवाडा परिसरात नागरिकांना वरुण राजाच्या अवकृपेचा सामना करावा लागत आहे. यामुळे रुसलेल्या वरुण राजाची कृपा व्हावी म्हणून यवतमाळ येथे शीतला मातेचा जलाभिषेक करण्यात येत आहे.
शीतला मातेला जलाभिषेक करत महिलांचे पाण्यासाठी साकडे - जलसंकट
जुलै महिना संपत आला तरी पाण्याचा पत्ता नाही. त्यामुळे भविष्यात येणारे जलसंकट टाळण्यासाठी यवतमाळच्या काही महिलांनी शितला मातेच्या मंदीरात जावुन जलाभिषेक करत चांगल्या पावसाकरिता साकडे घातले.
साकडे
यवतमाळमध्ये सरासरीच्या 33 टक्केही पाऊस झाला नाही. बहुतांश पेरण्या आटोपल्या असुन बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागुन आहेत. जुलै महिना संपत आला तरीही वरुण राजाचे हवे तसे आगमन झाले नाही. त्यामुळे भविष्यात येणारे जलसंकट टाळण्यासाठी यवतमाळच्या काही महिलांनी शितला मातेच्या मंदीरात जावुन चांगल्या पावसाकरिता साकडे घातले आहे. जिल्ह्यातील जलसंकट दुर करण्यासाठी महिलांच्या वतीने शीतला मातेच्या मुर्तीचा जलाभिषेक करण्यात येत आहे.