यवतमाळ- महागाव तालुक्यातील शिरपुल्ली येथे महिलेचा खून झाल्याची घटना आज (26 जून) उघडकीस आली. मृत महिलेचे नाव संगीता सुदर्शन कपाळे आहे. ही महिला शिरपुल्ली येथून दोन किलोमीटर अंतरावरील शेतातील गोठ्यावर राहत होती. या महिलेचा खून झाल्याची माहिती गावातील नागरिकांनी पोलीस पाटील आणि सरपंच नितीन उबाळे यांना दिली. याची शहानिशा करण्याकरिता हे घटनास्थळी गेले असता यांना महिला मृतावस्थेत आढळून आली.
महागाव तालुक्यातील शिरपुल्ली येथे महिलेचा खून - पोलीस पाटील
संगीता सुदर्शन कपाळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
यवतमाळ
पोलीस पाटील दत्ता फुलाजी अंभुरे यांनी तत्काळ याची माहिती दराटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जी. एस. पांडव यांना दिली. यानंतर पांडव आणि पोलीस उप निरीक्षक उमेश भोसले हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. प्रथम तपासणी केली असता महिलेच्या डोक्यावर आणि अंगावर घाव असल्याचे लक्षात आले. यावरून पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.