महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ : स्त्री रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी लवकरच 300 खाटांची सुविधा होणार उपलब्ध - कोरोना अपडेट्स यवतमाळ बातमी

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खाटांची संख्या कमी पडू नये, याबाबत शासन योग्य ती खबरदारी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्त्री व नवजात शिशु रुग्णालयात लवकरच 300 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत आज पालकमंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी केली.

यवतमाळ
यवतमाळ

By

Published : Sep 13, 2020, 8:05 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खाटांची संख्या तोकडी पडत आहे. कोविड हॉस्पीटल, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली असली तरी भविष्यात ही संख्या कमी पडू शकते. यामुळे, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्त्री व नवजात शिशु रुग्णालयात लवकरच 300 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आज (रविवार) पालकमंत्री संजय राठोड यांनी या रुग्णालयाची पाहणी केली.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सुपर स्पेशालिटीच्या हॉस्पीटलच्या धर्तीवर स्त्री रुग्णालयातही ऑक्सिजनची व्यवस्था असणाऱ्या खाटा तयार करण्यात येणार आहे. स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून इलेक्ट्रिक फिटींग व इतर किरकोळ कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्वरीत पूर्ण करण्यात येणार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय मिळून कोरोनाबाधित रुग्णांसाठी 500 ते 600 खाटांची व्यवस्था होणार आहे. उपचाराकरता डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय व इतर स्टाफ मागणीचे पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे.

कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता उर्वरीत काम तातडीने पूर्ण करण्यात आले नाही तर, संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्री राठोड यांनी दिला.

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वायडीसीसी बँकेचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती; संचालक मंडळ बरखास्त

ABOUT THE AUTHOR

...view details