यवतमाळ- महागाव तालुक्यातील माळेगाव येथे भीषण पाणीटंचाईने एका महिलेचा बळी घेतला आहे. पाणी भरण्यासाठी गेलेल्या विमल राठोड या महिलेचा 45 फूट खोल विहीरीत पडून मृत्यू झाला.
पाणीटंचाईने घेतला बळी.. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू - water
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील माळेगाव येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या विमल राठोड या महिलेचा 45 फूट खोल विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भीषण पाणीटंचाईने घेतला महिलेचा बळी
यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला
माळेगाव या गावाला बाराही महिने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही महिला पाण्यासाठी विहिरीवर गेली असता तेथे तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ती विहिरीत पडताच इतर महिलांनी आरडाओरडा केली. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला.
Last Updated : Jun 10, 2019, 11:43 PM IST