यवतमाळ- सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व्यवस्थित रेशन देत नसल्याचा आरोप करत जांब येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. या दुकानदाराकडून दुसऱ्या दुकानादाराकडे सोय करून देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.
सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात जांब येथील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक - yavataml ration shop news
सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व्यवस्थित रेशन देत नसल्याचा आरोप करत यवतमाळ जिल्ह्यातील जांब येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. या दुकानदाराकडून दुसऱ्या दुकानादाराकडे सोय करून देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.
![सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात जांब येथील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक women agitation against goverment ration shopkeeper](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5371828-368-5371828-1576325269345.jpg)
हेही वाचा - 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील'
गावातील जो परवानाधारक सरकारी स्वस्त धान्य दुकानदार आहे. तो व्यवस्थित साहित्य देत नाही, अशी महिलांनी तक्रार केली होती. सरकारी स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्याबाजारात विक्रीस नेताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. तरीही त्याचा परवाना निलंबित करण्यात आला नाही. अशा दुकानदाराकडील परवाना काढून तो गावातील दुसऱ्या दुकानदाराला देण्यात यावा अशी मागणी महिलांनी केली. यासोबतच, तो दुकानदार उद्धट वागणूक देतो, असा आरोप महिलांनी केला. यासंदर्भातही दखल घेण्याची मागणी महिलांनी यावेळी केली. यावेळी आमदार मदन येरावार यांनी महिलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले.