यवतमाळ - पोटच्या तीन वर्षाच्या मुलासह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे घडली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मोनाली लक्ष्मण पारखी (29) आणि जय लक्ष्मण पारखी (3) असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या आई व मुलाचे नाव आहे.
तीन वर्षाच्या चिमुकल्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, यवतमाळमधील घटना - woman committed suicide with child yavatmal news
यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील एका महिलेने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस तपास सुरू आहे.
मृत मोनाली ही शेतात जाते, म्हणून घरच्यांना सांगून गेली. मात्र, गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातीलच बोधाने यांच्या शेतातील विहिरीत दोघांचाही मृतदेह तरंगत असल्याचा आढळला. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांना तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोघाही माय-लेकाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मोनालीच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास जगदीश मंडलवार पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करत आहे.