महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून शेतकरी दाम्पत्य ठार, गावावर शोककळा - Ganeshwadi

शेतात काम करीत असताना वीजेचा लोळ अंगावर पडल्यामुळे शेतकरी दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. वासुदेव टेकाम आणि गंगाबाई टेकाम अशी मृतक पती-पत्नी यांची नावे आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गावात ही घटना घडली.

वीज पडून शेतकरी पती-पत्नी ठार

By

Published : Jun 6, 2019, 8:54 PM IST

Updated : Jun 6, 2019, 9:32 PM IST

यवतमाळ - वीज अंगावर पडून शेतकरी पती -पत्नी ठार झाल्याची घटना जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली. वासुदेव टेकाम आणि गंगाबाई टेकाम अशी मृतक पती-पत्नी यांची नावे आहेत.

वीज पडून शेतकरी दाम्पत्य ठार

शेतात खरीप हंगामाच्या पूर्व तयारीचे काम करीत होते. अचानक ढग दाटुन आले आणि विजांचा कडकडाट झाल्याने दोघेही शेतातील झाडाखाली थांबले होते. तिथेच त्यांच्या अंगावर वीज पडल्याने टेकाम दाम्पत्य जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटना स्थळ गाठले. महसूल विभागाचे नायब तहशीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यलयातील जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाला तात्काळ कळविण्यात आले. कळंब पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंब ग्रामीण रुग्णालयात पाठवविण्यात आले आहेत.

Last Updated : Jun 6, 2019, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details