यवतमाळ - शंभर टक्के पगार देण्याची तुमची मागणी शंभर दिवसांत निकाली काढून देतो, असे आश्वासन शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील यांनी दिले आहे. ते यवतमाळ येथे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी आले असता, पत्रकार परीषदेत बोलत होते.
शिक्षकांची शंभर टक्के पगाराची मागणी तीन महिन्यांत निकाली काढू - कपिल पाटील - amravati teacher constituency election
शिक्षकांची शंभर टक्के पगार देण्याची मागणी शंभर दिवसांत निकाली काढून देतो, असे आश्वासन शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील यांनी दिले आहे.
![शिक्षकांची शंभर टक्के पगाराची मागणी तीन महिन्यांत निकाली काढू - कपिल पाटील We will settle demand of hundred percent salary for teachers in three months said kapil patil in yavatmal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9682840-758-9682840-1606469464831.jpg)
विना अनुदानीत शाळेतील शिक्षकांचा पगाराचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. अनेक शाळांना अनुदान नसून आता फक्त 20 टक्के अनुदान लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना सुद्धा कमी पगारात काम करावे लागत आहे. आता अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीकडून दिलीप निंभोरकर यांना उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. निंभोरकर यांना शंभर टक्के मते देऊन विजयी करण्याचे आवाहन करीत कपिल पाटील यांनी शिक्षकांचे पगारासह विविध प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शिक्षकांना उपचारासाठी सरकारकडून नंतर पैसे मिळतात, आम्ही मात्र कॅशलेस सुविधा शिक्षकांना उपलब्ध करुन दिली आहे, असेही कपिल पाटील म्हणाले.
हेही वाचा- मोफत पाणी आणि वीज.. हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध