महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणात - yawatmal

मारेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून नळ जोडणी बंद असल्याने पाण्याचा ठणठणाट आहे. भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

यवतमाळ

By

Published : May 21, 2019, 12:09 AM IST

यवतमाळ - मारेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून नळ जोडणी बंद असल्याने पाण्याचा ठणठणाट आहे. भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

मारेगाव तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने शहरात अनेक वर्षा रुग्णालये सुरु करण्यात आली. मात्र, या रुग्णालयात रुग्णांना अनेक समशांचा सामना करावा लागत आहे.

यवतमाळ

गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात जिल्हा परिषद शाळेतून बोरवेल असून नगरपंचायतद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पाणी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील डॉक्टर व काही कर्मचारी स्वखर्चाने कशी-बशी रुग्णांची तहान भागवण्यासाठी मदत करत असल्याचे सांगितले. या संदर्भात नळ बंद असल्याचे नगरपंचायत कार्यालय येथे तोंडी तक्रार दिली. परंतु, अजूनपर्यंत नळ जोडणी मात्र दुरुस्त झालेली नाही. त्यामुळे नगरपंचायत कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.

आरओ मशीन लावून थंड पाणी देण्याची मागणी रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. रुग्णालयात नळ जोडणी व्यतिरिक्त परिसरात एक बोरवेल आहे. परंतु, त्या बोरचे पाणी काही प्रमाणात फ्लोराइड युक्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे तेथील पाणी कोणी वापरत नाही. परंतु, या बोरवेलवर शासनाने आर ओ मशीन लावून दिल्यास रुग्णालयात पाणी टंचाई भासणार नाही. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी टंचाई निवारण्यासाठी नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यांचे बिल भरण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. मात्र, यात मारेगाव नगरपंचायत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details