यवतमाळ - पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वानवाडी पोलीस ठाण्याचे पथक यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. मृतक पूजा चव्हाण हिने या जिल्हा रुग्णालयात खरोखरच उपचार घेतले का? या बाबतची तपास हे पथक करणार आहे. आज सायंकाळीच्या सुमारास हे पथक आले असून त्याबाबतची साणा यवतमाळ येथील शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.
काय आहे प्रकरण -
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.
हेही वाचा-समाज माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी; पूजाच्या वडीलांचे आवाहन