यवतमाळ- विज्ञानाच्या युगात आजअशक्य गोष्ट शक्य करणे सोपे झाले आहे. असाच काहीसा प्रयत्न यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हाआ तालुक्यातील बोरी अरब येथील पेट्रोल पंपावर कार्यरत असणाऱ्या विवेक कामकर यांनी केला आहे. अंड्यावर कोंबडी न बसवता अंड्यांमधून पिल्ली काढण्याची किमया त्यांनी करून दाखविली आहे.
कोंबडीविना उबविता येणार अंडी हेही वाचा - आता आमचा सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
विवेक कामकरने 'कॉलेज फॉर लीडरशिप ट्रेनिंग' येथे कार्यालय अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर बोरी अरब येथील पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत आहेत. विवेक यांनी आपल्या चिकित्सक बुद्धी चातुर्याचा परिचय देत अत्यल्प खर्चात एक मशीन तयार केली आहे. अंड्यावर कोंबडी न बसवता पिल्ले काढणारी ही मशीन जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा -भाजप आमदार बोदकुरवार यांचा शासकीय कामात अडथळा, गुन्हा दाखल
आपल्या कामातून वेळ काढत फक्त 1 हजार रुपयात हे मशीन तयार करण्यात आले आहे. 'इनक्युबलेटर'द्वारे विशिष्ठ तापमान देऊन गावारण कोंबडीची अंडी असो किंवा बॉयलर अंडी त्यातून पिल्ले तयार करणारी मशीन विवेक यांनी बनवली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील बेरोजगारांना ही मशीन उत्तम व्यवसायाचे एक प्रभावी साधन ठरू शकते. कमी खर्चातही हा व्यवसाय नक्कीच जास्त नफा मिळवून शेती सोबत जोडधंदा म्हणून केल्यास उत्पन्नात भर पडू शकते, असे विवेक यांनी सांगितले आहे.