यवतमाळ - जीवनोन्नती अभियानाच्या 'उमेद'मधून जिल्ह्यातील १ हजार ३२० गावात १७ हजार बचतगटांची निर्मिती करण्यात आली आहे. या अभियानात जवळपास ३५ लाख कुटुंबं जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्यात परिवर्तन घडून येत आहे. बचतगटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड पूर्ण होत आहे. कर्जफेडीत महिला प्रामाणिक असल्यामूळे त्यांना आता व्यवसाय उद्योगासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उमेदमधून घेतलेल्या कर्जाची महिलांकडून प्रामाणिकपणे परतफेड - फडणवीस
जीवनोन्नती अभियानाच्या 'उमेद'मधून जिल्ह्यातील १ हजार ३२० गावात १७ हजार बचतगटांची निर्मिती करण्यात आली आहे. या अभियानात जवळपास ३५ लाख कुटुंबं जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्यात परिवर्तन घडून येत आहे. बचतगटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड पूर्ण होत आहे.
ते यवतमाळ येथील पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या बचतगटांना १२३ कोटींचा फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात २५४ तालुक्यात उमेदची व्याप्ती आहे. या तालुक्यात २ लाख ६५ हजार महिलांचे बचत गट कार्यरत आहेत. जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात येईल. त्या माध्यमातून विशेष योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी देखील विशेष पारधी विकास अधिकारी नियुक्त केला आहे. त्या माध्यमातून पारधी विकासाला गती मिळालेली आहे. जिल्ह्यातील आदिवासींचे ३६१ कोटीचे खावटी कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच त्यांना मुबलक अन्न धान्य पूरवठा करण्यात येईल. त्यामुळे त्यांना खावटी कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. सिंचन व रस्ते विकासात मोठे काम झाले आहे. वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम पूर्णत्वास येत आहे. जिल्ह्यातील कापसावर याच ठिकाणी प्रक्रिया करून कापूस ते कापड निर्मितीसाठी येथेच एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत बोलत होते.