यवतमाळ- पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यलगतच्या गावांमध्ये वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या वाघिणीने अनेक गुराढोरांची शिकार केली. मात्र, काल (१९ सप्टेंबर) लक्ष्मीबाई दडांजे या शेतकरी महिलेवरही वाघिणीने हल्ला करून तिला ठार केले. त्यामुळे, या वाघिणीला लवकरात लवकर बंदिस्त करा, असा ठराव ग्रामस्थांनी केला आहे.
पांढरकवडा तालुक्यात वाघिणीची दहशत, बंदिस्त करण्याचा ग्रामस्थांनी केला ठराव
आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी वाघिणी संदर्भात बैठक बोलवली होती. यात अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी गावातील ग्रामस्थांनी व वनविभागाने हा ठराव केला आहे. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (नागपूर) यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी वाघिणीसंदर्भात बैठक बोलवली होती. यात अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी गावातील ग्रामस्थांनी व वनविभागाने हा ठराव केला आहे. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (नागपूर) यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात वाघिणीच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी. तसेच, अभयारण्यलगतच्या शेतीला तार कुंपण घालून द्यावे. त्याचबरोबर, टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांचे नियंत्रण करावे व आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे शिथिल करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. वनमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात तरी, वनविभागाने गांभीर्य दाखवावे. अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार धुर्वे यांनी दिला.
हेही वाचा-माझे कुटुंब-माझी जबाबदारी, या प्रमाणे वागाल तरच कोरोनापासून वाचाल - संजय राठोड