महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर वाहनांच्या रांगा

कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्य प्रशासनाकडून देखील दिलेल्या निर्देशांनुसार सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर जाणवत आहे.

Vehicles queue at Maharashtra-Telangana border
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वाहनांच्या रांगा

By

Published : Mar 25, 2020, 12:13 PM IST

यवतमाळ -राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून तेलंगाणा राज्याला जोडणारा नागपूर-हैदराबाद हा क्रमांक 7 चा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र, हा महामार्ग बंद केल्यामुळे यवतमाळच्या सीमावर्ती भागात असलेल्या पिंपळखुटी चेकपोस्टवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहे.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वाहनांच्या रांगा

हेही वाचा...जान है तो जहान है... आज मध्यरात्रीपासून २१ दिवस देश लॉकडाऊन - पंतप्रधान मोदी

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वाहनांच्या रांगा...

यवतमाळ जिल्ह्यात पाटणबोरी ते पांढरकवडापर्यंत या वाहनांच्या रांगा पोहोचल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून अशाच प्रकारे वाहनांच्या रांगा लागल्या आहे. तेलंगणा राज्यातून येणाऱ्या वाहनांची आणि वाहनातील व्यक्तीची तपासणी करूनच त्यांना पुढे सोडले जात आहे. वाहने आता लवकर पुढे जाणे शक्य नसल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details