यवतमाळ - यवतमाळ येथील प्रख्त्यात मानसिक रोगतज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैदराबाद मार्गावर हा भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या पत्नी प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अन्य तीन जन गंभीर जखमी झाल्याची प्रमाथमीक माहिती आहे. दोन वाहनातून डॉक्टर व त्यांच्या मित्रांचे कुटूंब यवतमाळकडे येत असतांना ही घटना घडली आहे.
हैदराबाद मार्गावर वाहनाला अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर तीन जखमी - Vehicle accident on Hyderabad road
यवतमाळ येथील प्रख्त्यात मानसिक रोगतज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैदराबाद मार्गावर हा भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या पत्नी प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अन्य तीन जन गंभीर जखमी झाल्याची प्रमाथमीक माहिती आहे. दोन वाहनातून डॉक्टर व त्यांच्या मित्रांचे कुटूंब यवतमाळकडे येत असतांना ही घटना घडली आहे.
डॉ. बरलोटा व त्यांचे मित्राचे कुटूंब यवतमाळला परत येत असतांना निर्मल ते हैदराबाद मार्गावर टोल नाक्यानजीक निर्मलपासून 12 किमोमिटर अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक फुटले. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. (एमएच 29 बीपी 4200 क्रमांक) असलेली ही गाडी आहे. अपघातानंतर तेथील नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (पुजा पियुष बरलोटा वय 16) तसेच, अतिथी (वय 18) आणि मिनल (वय 40) असे तिघेजन निर्मल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.