यवतमाळ-केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या लॉकडाऊनच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी राज्यभरात डफली वाजवा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यवतमाळमध्येही प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने यवतमाळ बस स्थानक परिसरात डफली वाजवा आंदोलन करण्यात आले, अशी माहिती जिल्हाध्यक्ष जितेश राठोड यांनी दिली.
यवतमाळमध्ये बहुजन वंचित आघाडीचे बसस्थानक परिसरात डफली वाजवा आंदोलन - जितेश राठोड न्यूज
केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या लॉकडाऊनच्या धोरणाविरोधात आणि राज्यातील एस.टी.महामंडळ सेवा व सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्याबाबत आवाज उठवण्यासाठी डफली वाजवा आंदोलन करण्यात आले आहे.
राज्यातील एस.टी.महामंडळ सेवा व सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्याबाबत आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात वाहतूक सेवा बंद आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तसेच महामंडळाच्या बससेवा बंद असल्याने एस. टी. कामगारांचा रोजगार बुडाला आहे, त्यामुळे एस.टी.सेवा सुरु करावी, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.
एस.टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक वाहतूक सुरू करावी यासाठी यवतमाळ बस स्थानक परिसरात डफली वाजवा आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच बसस्थांनकांवर आंदोलन करण्यात आले.