महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर

राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुन्हा एकदा ईव्हीएमवर चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला सुरुवात केली आहे. आंबेडकर म्हणाले, ईव्हीएममध्ये गैरप्रकार होणार यात मला काहीही शंका नाही.

प्रकाश आंबेडकर

By

Published : Oct 12, 2019, 3:29 PM IST

यवतमाळ - राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुन्हा एकदा ईव्हीएमवर चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला सुरुवात केली आहे. आंबेडकर म्हणाले, ईव्हीएममध्ये गैरप्रकार होणार यात मला काहीही शंका नाही. मात्र, ईव्हीएम हॅक करणारी एक इंडस्ट्री आहे. ती यंदाही चालूच राहिली तर तीचं आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे हे अर्थकारण चाललं पाहिजे यासाठी हॅकिंग होऊ देणार नाही. तसेच एकाच पक्षाची सत्ता येऊ देणार नाही. असे वक्तव्य आंबेडकरांनी यवतमाळमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत केले.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर

हेही वाचा - विखे पाटील सहकारी साखर कारखाना कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करा - मुंबई उच्च न्यायालय

आंबेडकर म्हणाले, यावेळी आम्हाला चांगल्या जागा मिळणार आहेत. लोकसभेत ईव्हीएम मुळे 12 जागा हरलो असल्याचे ते बोलले. तसेच ईव्हीएम हॅकचे जनक हे काँग्रेस असून त्यांचा हा भ्रष्टाचार समोर येईल म्हणून ते पुढे येत नसल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले 2004 मध्ये मला लोकांनी नाही तर ईव्हीएमने हरवले आहे.

हेही वाचा - काँग्रेसचं सध्या चाललयं काय? बाळासाहेब थोरात यांची अनकट मुलाखत

ABOUT THE AUTHOR

...view details