यवतमाळ - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी तर आर्णी मतदारसंघातून माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
शक्तीप्रदर्शन करत वसंत पुरकेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी तर आर्णी मतदारसंघातून माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
वसंत पुरके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदी मोठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांच्यासह सर्व नेत्यांनी युती सरकारवर टीका केली. यावेळी काँगेसचे सर्व गट एकत्र दिसून आले. 2014 च्या निवडणुकीत गटबाजीमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. म्हणून यावेळी सर्व मतभेद विसरून काँग्रेसला मतदान करण्याचे आव्हान सर्व नेत्यानी केले. ही गर्दी कायम राहील की नाही हे मताधिक्यातून समोर येईल. भाजप सरकारने खोटे आश्वासन, फसवी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, ग्रामीण भाग विकासापासून वंचित ठेवला आहे. अशा अनेक मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे पुरकेंनी सांगितले.
.