यवतमाळ - पुढील अडीच वर्षासाठी जिल्ह्यातील वणी पंचायत समितीची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत सत्तेचे नवीन समीकरण पाहायला मिळाले. सभापती म्हणून भाजपचे संजय पिंपळशेंडे व उपसभापती भाकपच्या चंद्रज्योती शेंडे यांची निवड करण्यात आली.
वणी पंचायत समिती: सभापती भाजपचा तर उपसभापती भाकपचा - सभापती भाजपचा तर उपसभापती भाकपचा
पुढील अडीच वर्षासाठी जिल्ह्यातील वणी पंचायत समितीची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत सत्तेचे नवीन समीकरण पाहायला मिळाले. सभापती म्हणून भाजपचे संजय पिंपळशेंडे व उपसभापती भाकपच्या चंद्रज्योती शेंडे यांची निवड करण्यात आली.
8 सदस्य असलेल्या पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांचे समर्थन मिळाल्यामुळे भाजपचे संजय पिंपळशेंडे यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी भाकपच्या चंद्रज्योती शेंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मागील अडीच वर्षे भाकपच्या चंद्रज्योती शेंडे यांच्या सहकार्याने भाजपच्या लिशा विधाते या सभापती व उपसभापती म्हणून संजय पिंपळशेंडे यांनी अतिशय उत्तम कार्य केले. शासनाच्या अधिसूचनेनुसार येत्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गसाठी सभापती पद आरक्षीत झाल्यामुळे भाजपचे संजय पिंपळशेंडे यांनी शिवसेनेचे टिकाराम खाडे यांचा व भाकपाच्या चंद्रज्योती शेंडे यांनी शिवसेनेच्या वर्षा पोतराजे यांचा 5 विरुद्ध 3 मतांनी पराभव केला.