यवतमाळ -जिल्ह्यातील वणी शहरातील दीपक टॉकीज परिसरात असलेल्या खुल्या मैदानावर गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करीत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी दोन मांस विक्री दुकानावर छापा टाकून गोमांस व १३ जनावरे जप्त केली आहे. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून इतर तीन आरोपी फरार झाले आहेत.
वणी शहराजवळील अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा
यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलिसांचा अवैध कत्तलखान्यांवर छापा. कत्तलखान्याशेजारीच अत्यंत क्रूर पद्धतीने बांधून ठेवलेल्या १३ गोवंशाची वनी पोलिसांनी मुक्तता केली.
पोलिसांनी सैय्यद मोहम्मद सैराज (39), जुबेर मुनाब कुरेशी (35),मोहम्मद अनिस कुरेशी(45), तौसिफ रईस कुरेशी(30) या चौघांना ताब्यात घेतले आहे. तर एजाज अजीज कुरेशी (50), कैसर अजीज कुरेशी (40), पाशा अजीज कुरेशी (38) हे तिघे फरार झाले आहे.
गोवंशाची हत्या व त्यांच्या मांस विक्रीवर बंदी असतानाही गोवंशाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वणी लगत असलेल्या तेलंगणा व आंध्रप्रदेशात या जनावरांची तस्करी केली जाते. ही जनावरे नागपूरवरून वणी मार्गाने नेली जातात. पोलिसांनी आतापर्यंत अनेक कारवाया करून शेकडो जनावरांनी सुटका केली आहे.