महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रहारच्या उमेदवार वैशाली येडेंना दुबईतून मदत - विकास गुतळवाड

प्रहारच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली येडेंना विकास गुतळवाड या तरुणाने दुबईतून २३०० रुपयांची मदत पाठवली आहे.

वैशाली येडे

By

Published : Mar 29, 2019, 10:01 PM IST

यवतमाळ - बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. येडेंना निवडणूक लढविण्यासाठी मदत व्हावी, यासाठी विकास गुतळवाड या तरुणाने दुबईतून २००० रुपयांची मदत पाठवली आहे.

विकास गुतळवाड

यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन एका शेतकऱ्याची विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दुःख मांडताना, शेतकऱ्यांना लढाईचे आवाहन केले होते. त्यामुळे प्रहारचे पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी त्यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली. येडे या विधवा असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडून लोकवर्गणी गोळा केली जात आहे. आज त्यांना दुबई येथे मजुरी करणाऱ्या विकासने २००० रुपयांची मदत पाठवली आहे.

विकास म्हणाला, आजपर्यंत अनेक उमेदवार पाहिले. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी व्यक्तीला उमेदवारी दिल्याने मीही छोटीशी मदत करत आहे. आतापर्यंत प्रहारने लोकवर्गणीमधून ६० हजार रुपये जमा झाले आहे. आमच्या कामाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती प्रहारचे राज्य प्रमुख प्रमोद कुदळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details