यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस दिले जात आहे. परंतू जिल्ह्यात आता कोविड लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.
95 केंद्रावरील लसीकरण पडले बंद, केवळ 15 हजार कोविड लस शिल्लक - Corona Vaccination
जिल्ह्यात आता केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लस साठा शिल्लक राहीला आहे. 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. त्यामुळे दरदिवशी 7 हजारांहून अधिक लसीची मागणी होत आहे.
केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक
जिल्ह्यात आता केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लस साठा शिल्लक आहे. आज किंवा उद्या जिल्ह्यातील कोविड-19 प्रतिबंधक लसींचा साठा संपेल. जिल्ह्यातील 117 केंद्रावरून लसीकरण करण्यात येत असून 22 केंद्रावर लसींचा साठा आहे.
लसीकरणाचे नियोजन कोलमडण्याची भीती
जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. त्यामुळे दरदिवशी 7 हजारांहून अधिक लसीची मागणी होत आहे. 117 केंद्रांवरून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु असून शासन प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे नागरिकांचा देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरी व ग्रामीण भागात 45 वर्षांवरील नागरिक केंद्रावर लसीचे डोस घ्यायला येत आहेत. मात्र आता लसींचा साठा संपत आला आहे. त्यामुळे ताबडतोब जिल्ह्यात लसींचा पुरवठा न झाल्यास, आरोग्य विभागाचे लसीकरणाचे नियोजन कोलमडण्याची भीती आहे.
नऊ लाख डोसची आवश्यकता
जिल्ह्याला एक लाख 54 हजार डोस प्राप्त झाले होते. यातील एक लाख 41 हजार 600 डोस देण्यात आले आहेत. जवळपास 13 हजार डोसचा साठा शिल्लक असून, फक्त आज सायंकाळपर्यंत तो पुरणार आहे. जिल्ह्याला नऊ लाख लसींची आवश्यक आहे. अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा -गुजरातमधील शाळेच्या इमारतीला आग; चार मुलं छतावर अडकली