महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकरी, शेतमजुरांच्या सोयीस्कर वेळी कोरोना लसीकरण करा' - यवतमाळ कोरोना प्रतिबंधक लसीकरण

पेरणीचा हंगाम हा लगबगीचा काळ असतो. या दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा वेळ अत्यंत मोलाचा असल्याने शेतीची मशागत, बियाणे व खतांची जुळवाजुळव, पेरणी, मजुरांची उपलब्धता याकडे शेतकऱ्यांचे सर्वाधिक लक्ष असते. त्यामुळे सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ग्रामीण भागामध्ये लसीकरण केले गेल्यास ग्रामस्थांचा अधिक प्रतिसाद मिळेल.

Vaccinate at convenient time for farmers, farm laborer
'शेतकरी, शेतमजुरांचे सोयीच्या वेळेत कोरोना लसीकरण करा'

By

Published : Jun 20, 2021, 2:19 PM IST

यवतमाळ -सध्या आरोग्य विभागातर्फे सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. साधारणतः सकाळी १० नंतर ही प्रक्रिया सुरु होते. मात्र हा पेरणीचा काळ असल्यामुळे सकाळी ७ नंतर जवळपास सगळेच शेतकरी व शेतमजूर शेतामध्ये असतात. त्यामुळे अनेकजण लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना सोयीच्या वेळेत लसीकरण केले जावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार यांनी प्रशासनाला केली आहे.

'शेतकरी, शेतमजुरांचे सोयीच्या वेळेत कोरोना लसीकरण करा'

पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर मोहीम राबवा -

लस घेतल्यानंतर काही काळ आरामही गरजेचा असतो. त्यामुळे योग्यवेळी लसीकरण झाल्यास ग्रामस्थांना नियोजन करणे सोपे जाईल. पेरणीचा हंगाम हा लगबगीचा काळ असतो. या दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा वेळ अत्यंत मोलाचा असल्याने शेतीची मशागत, बियाणे व खतांची जुळवाजुळव, पेरणी, मजुरांची उपलब्धता याकडे शेतकऱ्यांचे सर्वाधिक लक्ष असते. त्यामुळे सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ग्रामीण भागामध्ये लसीकरण केले गेल्यास ग्रामस्थांचा अधिक प्रतिसाद मिळेल. पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होईल. संभाव्य तिसरी लाट येऊ नये, यासाठी लसीकरण मोहीम अधिक व्यापक करून इतर समाज घटकांनाही यामध्ये सामील करण्यात यावे. अशी मागणी पवार यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details