यवतमाळ - धर्मांतरण रॅकेटमध्ये पटवारी कॉलनी येथील रहिवासी धीरज जगताप याला उत्तर प्रदेश एटीएसकडून काल कानपूर येथून अटक करण्यात आली. 8 ते 10 वर्षांपूर्वी धीरज जगताप मुस्लीम धर्म स्वीकारून तो धर्म परिवर्तनच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. या अगोदर दीड महिन्यापूर्वी जिल्ह्याच्या पुसदमधील डॉक्टरला एटीएसकडून अटक झाली होती. आता धीरज जगतापला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
चार महिन्यांपासून -
धीरजचे शिक्षण हे पुसद येथील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये झाले आहे. त्यानंतर तो बांधकाम व्यवसायीक म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न 2011मध्ये झाले. 2015 साली त्याची पत्नी त्याच्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली आहे. धीरज हा स्वभावाने शांत होता. तसेच तो इतर कोणाशी बोलतही नव्हता. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या सर्वांमध्ये त्याचा सहभाग नसेल, असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो घरातल्या कोणात्याच व्यक्तीच्या संपर्कात नव्हता, अशी माहिती त्याच्या बहिणीने दिली आहे.
हेही वाचा -...म्हणून भाजपाला ज्योतिष बदलण्याची गरज; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची खोचक टीका