महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजेच्या कडकडाटासह यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी - yavatmal latest news

यवतमाळ जिल्ह्यात आज सकाळी अकराच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कालही काही तालुक्यात रात्रीच्या सुमारास तुरळक पावसाने हजेरी लावली.

rain
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By

Published : Feb 18, 2021, 7:15 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात आज सकाळी अकराच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कालही काही तालुक्यात रात्रीच्या सुमारास तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. जिल्ह्यात अवकाळी पाऊस अजूनही अधूनमधून हजेरी लावत आहे. आधीच जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. अशातच अवकाळी पावसामुळे दमट वातावरणामुळे वृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. याचा फटका शेतीलाही बसला आहे.

रब्बी हंगामातील पीक धोक्यात, थंडीही वाढली

ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पीक धोक्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात थंडीची लाट सुरू आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे जोरदार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गहू आणि हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पावसामुळे फटका बसला होता. कमी उत्पन्न झाल्यामुळे लागवड खर्च निघू शकला नाही. आता अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला रब्बी हंगामाचा घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details