यवतमाळ- आर्णी तालुक्यात आज दुपारी झालेल्या ट्रॅकरच्या ( Yavatmal tractor accident ) भीषण अपघातात दोन जण ठार झाले आहेत. हा अपघात जवळा येथील गवणा रोड जवळील उड्डाण पुलाखाली झाला आहे. अपघातामध्ये १९ वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. तर २ वर्षीय बालक जागीच ठार झाले ( two deaths in Yavatmals tractor accident ) आहे.
जवळा गावातील राहुल अरुण जवके हा (एम एच २९ बी पी ६०२५) या ट्रॅक्टरवर बसून त्याच्या पुतण्याला घेऊन राष्ट्रीय महामार्ग वरून शेतात जात होता. दरम्यान ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. अचानक ट्रॅक्टरचा वेग वाढल्याने ट्रॅक्टर हा रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर जाऊन पलटी झाला. दुर्घटनेत जवळा येथील राहुल अरुण जवके (19) वर्ष व देऊ स्वप्नील जवके (वय २) या दोघांचा ट्रॅक्टर खाली दबून जागीच ( Uncle Nephew Death in tractor accident ) मृत्यू झाला.
हेही वाचा-Cm Yogi Adityanath - योगी आदित्यनाथ यांना मालेगाव ब्लास्ट प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न, साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा
जवळा गावात हळहळ व्यक्त
भीषण अपघातात ट्रॅक्टर दोघांच्या अंगावर पलटी होऊन पुन्हा सरळ झाला. त्यावेळी १९ वर्षीय तरुण व २ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही सख्खे काका-पुतणे होते. यावेळी जवळा बायपासवर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. ही माहिती आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांना मिळताच सरकारी वाहन घेऊन आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह विच्छेदन करण्याकरिता आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. या घटनेने सर्व जवळा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव ( Arni Police station PI Pitambar Jadhav ) यांच्या मार्गदर्शनात जमादार संजय भारती व जमादार अरुण पवार करीत आहेत.
हेही वाचा-Nana Patole On Governer : राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा : नाना पटोले