महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनधिकृत बीटी बीयान्यांची पाकीटे जप्त; दोघांना अटक

विक्रीस बंदी असलेल्या बीटी बीयान्यांची शेतकऱ्यांना अनधीकृतपणे विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राळेगाव येथे केली.

By

Published : Jun 1, 2021, 2:19 AM IST

अनधिकृत बीटी बीयान्यांची पाकीटे जप्त; दोघांना अटक
अनधिकृत बीटी बीयान्यांची पाकीटे जप्त; दोघांना अटक

यवतमाळ - विक्रीस बंदी असलेल्या बीटी बीयान्यांची शेतकऱ्यांना अनधीकृतपणे विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राळेगाव येथे केली. वसिम नुरमोहम्मद आणि इम्रान नुर मोहम्मद असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नावं आहेत.

वीस हजारांचा साठा जप्त

राळेगाव तालुक्यातील रत्नापुर येथील वसिम नुरमोहम्मद व इम्रान नुर मोहम्मद यांच्या पोल्ट्री शेडमध्ये, अनधिकृत बीटी बियान्याची साठवणूक केली असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. यामध्ये कलपावृक्ष हे प्रिंट असलेले सिलबंद पाकीट, असे २१ पाकीट, आदर्श ११ नाव असलेले एक, सिकंद हायब्रीड नरमा बीज असे दोन, तर पिंक गार्डचे एक असा २० हजाराचा साठा यावेळी सापडला. दरम्यान, राळेगन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरुन राळेगाव पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलंगना गुजरात मधील बियान्याची चर्चा

जिल्ह्यात दरवर्षी परराज्यांतून व लगतच्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांची घुसखोरी होते. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल २७ लाखांचे बियाणे जप्त करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांतच जिल्ह्यात अनधिकृत बियाण्यांवर कारवाई करण्यात आली. यानंतर आता कृषी विभागाने रत्नापुर येथे ही कारवाई केल्याने, जिल्ह्यात अनधिकृतरित्या होणाऱ्या बीयाणे विक्रीच्या प्रकाराला पुन्हा दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माळोदे, कृषी अधिकारी पंकज बरडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details