महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छ भारत मिशनमध्ये 65 लाखांचा घोटाळा, भाजप आमदारासह 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल - घनकचा संकलन घोटाळा नामदेव ससाणे गुन्हा दाखल

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत घनकचरा संकलन व विल्हेवाट कामात 65 लाखांचा घोटाळा केल्याप्रकरणी उमरखेड मतदार संघाचे भाजप आमदार नामदेव ससाणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

MLA Namdev Sasane case registered
नामदेव ससाणे गुन्हा दाखल

By

Published : Feb 7, 2022, 10:24 PM IST

Updated : Feb 7, 2022, 10:38 PM IST

यवतमाळ - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत घनकचरा संकलन व विल्हेवाट कामात 65 लाखांचा घोटाळा केल्याप्रकरणी उमरखेड मतदार संघाचे भाजप आमदार नामदेव ससाणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या तक्रारीवरून नामदेव ससाणेंसह 11 जणांविरुद्ध उमरखेड पोलिसात सोमवारी 7 फेब्रुवारीला विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा -यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन

यामध्ये नगराध्यक्ष नामदेव ससाने, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, कंत्राटदार, मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे यांच्यासह लेखापाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव
अशा 11 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम 58 (2) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रारीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी यांना कामात अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला होता. यावर नगर विकास मंत्रालयाने शिक्कामोर्तब करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

या अकरा जणांविरुद्ध कचरा संकलन घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळल्याचे नगर विकास मंत्रालय आदेशात म्हटले होते. यावरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याची जबाबदारी दिली होती. यावरून मुख्याधिकारी यांनी 6 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवर ठाणेदार अमोल माळवे यांनी दस्तऐवजाची पडताळणी सुरू करून आज 7 फेब्रुवारी रोजी 420, 409, 465, 467,468,471, 34 नुसार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -Sunil Diware Murder Case : आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिक एसपी कार्यालयात; केल्या 'या' मागण्या

Last Updated : Feb 7, 2022, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details