यवतमाळ - अगदी वर्दळीच्या परिसरातून अॅक्टिवा गाडी चोरून नेणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दुचाकी चोरटे अत्यंत सक्रिय झाले असून, त्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
यवतमाळमध्ये दुचाकीस्वार चोरटा सीसी टीव्हीत कैद - यवतमाळमध्ये दुचाकीस्वार चोरटा सीसी टीव्हीत कैद
गदी वर्दळीच्या परिसरातून अॅक्टिवा गाडी चोरून नेणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दुचाकी चोरटे अत्यंत सक्रिय झाले असून, त्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.

यवतमाळमध्ये दुचाकीस्वार चोरटा सीसी टीव्हीत कैद
यवतमाळच्या अगदी मध्यवस्तीत असलेल्या सत्कार हॉटेलजवळ अशोक रोकडे आपली अॅक्टिवा गाडी पार्क करून काही कामानिमित्त गेले होते. यावेळी दुचाकी चोराने अगदी २ मिनिटातच गाडी लंपास केली. चोर दुचाकी घेऊन जात असल्याचे सी सी टीव्ही फुटेज हे पोलिसांच्या हाती लागले असून, पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे हा चोरटा एका पायाने दिव्यांग आहे. सी सी टीव्हीच्या आधारे हा चोरटा लवकरच गजाआड होईल असा पोलिसांना आत्मविश्वास आहे.