यवतमाळ - शहरातील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आठ दुचाकी वाहने आहेत. एकूण किंमत एक लाख 25 हजाराचा मुदे्माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यवतमाळ शहर पोलिसांनी रविवारी (24 जुलै)ला केली आहे.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ - आकाश श्रीकृष्ण कुमरे रा. जांब ता. जि. यवतमाळ, जितेंद्र शंकर जाधव रा. तिवसा, नागसेन ऊर्फ बालु केशव मनवर रा. कामठवाडा, संदिप ऊर्फ मोधन भिमराव कांबळे रा. यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. मागील काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.