यवतमाळ - येथील मारेगावपासून दोन किमी अंतरावर ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वारासह दोन जण जागीच ठार झाले. तर ऑटोतील सहा जण जखमी झाले आहेत. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रिक्षा क्र. (MH.२९ M. ५२८४) बोटोणीकडून मारेगावकडे प्रवासी घेऊन येत होता. मारेगाव येथील विनायक कोटेक्स जिनिंगजवळ ऑटोच्या समोर गाय आली. त्याच वेळी मारेगाव वरून दुचाकी क्र. (MH.२९ K ३४२८) बोटोणीकडे जात होती. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटोने दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीचालक व मागे बसलेली व्यक्ती जागीच ठार झाली. तर ऑटोमधील चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहे.