महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी, झरी वनपरिक्षेत्रातील घटना - tiger attack in yavatmal

सुधाकर व रामकृष्ण हे दोघे दुपारी बैलांना पाणी पाजण्यासाठी जुनोनी शिवारातील चाटवण नाल्यावर गेले असता, वाघाने अचानक दोघांवर हल्ला चढविला. सुधाकर याची मान पकडून त्याला ओढत नेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सुधाकरच्या सर्व शरीरावर गंभीर जखमा झाल्या. वाघाने रामकृष्णवर झडप घेण्याचा प्रयत्न करताच वाघाचा प्रतिकार करून तो झाडावर चढण्याच्या प्रयत्नात असताना वाघाने त्याचा पाय तोंडात पकडल्याने त्याच्या पायाची बोटे कुरतडली गेली.

वाघाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
वाघाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

By

Published : Jun 1, 2021, 1:19 PM IST

यवतमाळ - झरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मांडवी बीटमध्ये येथे आज दुपारी वाघाच्या हल्ल्यात दोघेजण दोघे गंभीर जखमी झाले. सुधाकर रामभाऊ मेश्राम (३५) व रामकृष्ण कानू टेकाम (२२) दोघही राहणार बेलमपल्ली ता. झरी अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

वाघाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले होते नाल्यावरसुधाकर व रामकृष्ण हे दोघे दुपारी बैलांना पाणी पाजण्यासाठी जुनोनी शिवारातील चाटवण नाल्यावर गेले असता, वाघाची चाहूल लागताच बैलांनी धूम ठोकली. त्याचवेळी वाघाने अचानक दोघांवर हल्ला चढविला. सुधाकर याची मान पकडून त्याला ओढत नेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सुधाकरच्या सर्व शरीरावर गंभीर जखमा झाल्या. वाघाने रामकृष्णवर झडप घेण्याचा प्रयत्न करताच वाघाचा प्रतिकार करून तो झाडावर चढण्याच्या प्रयत्नात असताना वाघाने त्याचा पाय तोंडात पकडल्याने त्याच्या पायाची बोटे कुरतडली गेली.दीड वर्षांपासून परिसरात वाघाची दहशतदोघांच्याही ओरडण्याने लगतच्या शेतातील शेतकरी मदतीस धावून आले. शेतकऱ्यांनी या वाघास पिटाळून लावले. शिवारातच काम करीत असलेले राजू आणि सुनील मेश्राम यांनी दोन्ही जखमींना बैलगाडीत टाकून मांडवी गावापर्यंत आणले. वनविभागास घटनेची माहिती दिलीअसता, वनविभागाच्या पथकाने तत्काळ मांडवी गाव गाठून दोन्ही जखमींना पांढरकवडा येथे उपचारासाठी नेले. तेथून दोघांनाही यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून या परिसरात वाघाची दहशत असून काही दिवसांपूर्वीसुद्धा या परिसरात वाघाने दोघांवर हल्ला केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details