महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बस-मोटरसायकलच्या अपघातात दोन ठार, एक गंभीर; पुसद जवळील घटना - यवतमाळ अपघात बातमी

मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने पुसद तालुक्यातील कोपरा फाटयाजवळ बस आणि मोटारसायकलदरम्यान अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

two-people-died-and-one-injured-in-bike-accident-in-pusad
बस आणि मोटरसायकलच्या अपघातात दोन ठार एक गंभीर; पुसद जवळील घटना

By

Published : Oct 2, 2020, 5:10 PM IST

Updated : Oct 2, 2020, 5:41 PM IST

पुसद(यवतमाळ) -तालुक्यातील कोपरा फाटयाजवळ आज सकाळच्या सुमारास बस आणि मोटारसायकलच्या अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

बस-मोटरसायकलच्या अपघातात दोन ठार, एक गंभीर; पुसद जवळील घटना

पुसद आगाराची बस (एम.एच. ४० एन. ८९३२) पुसदवरून नांदेडकडे निघाली होती. ही बस कोपरा फाटयाजवळ पोहोचल्यानंतर समोरून येणारी मोटारसायकल (एम.एच. २९ ए.एस. ७१४१) ही ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी बसला धडकली. दरम्यान बस चालकाने बस रोडच्या खाली उतरवली परंतु मोटरसायकलवर तिघेजण असल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून बसला समोरासमोर धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील तिघेही खडकदरी येथील रहिवासी असून सुशील शिवाजी कुरुडे (२३) याचा जागीच, तर विक्रम पुंजाजी चव्हाण (२३) याचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला असून रवी अशोक कुराडे (२७) हा युवक गंभीर जखमी आहे. त्याला पुसद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Last Updated : Oct 2, 2020, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details