यवतमाळ- कोरोनाबाधित रुग्ण वाढीचा वेग मंदावला असला तरी अधूनमधून एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 84वर पोहोचली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेले हे रुग्ण नेर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य आहेत.
यवतमाळमध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 84 वर - yavatmal corona news
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 84वर पोहोचली आहे.
सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 139 जण भरती आहेत. यापैकी 55 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 48 रिपोर्ट प्राप्त झाल आहेत. यात दोन पॉझिटिव्ह तर 46 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शुक्रवारी तपासणीकरिता 57 नमुने पाठविण्यात आले. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 1426 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. यापैकी वैद्यकीय महाविद्यालयाला 1273 प्राप्त तर 153 अप्राप्त आहेत. प्राप्त नमुन्यांपैकी 1179 नमुने निगेटिव्ह आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 109 तर गृह विलगीकरणात 1121 जण आहेत.