महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये आणखीन दोन कोरोनाबाधितांची वाढ, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्के - यवतमाळ कोरोना बातम्या

गत 24 तासात प्राप्त झालेल्या अहवालांपैकी दोन पॉझिटिव्ह तर 65 जणांचे निगेटिव्ह अहवाल आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 2,564 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 2558 प्राप्त तर सहा अहवाल अप्राप्त आहेत.

यवतमाळ कोरोना
यवतमाळ कोरोना

By

Published : Jun 10, 2020, 9:20 PM IST

यवतमाळ - महागाव येथील कारोनाबाधित मृताच्या निकटच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35 झाली होती. मात्र, आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला एक रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 34 ॲक्टिव्ह पॉझिटिव्हसह एकूण 43 जण भरती आहेत.

गत 24 तासात प्राप्त झालेल्या अहवालांपैकी दोन पॉझिटिव्ह तर 65 जणांचे निगेटिव्ह अहवाल आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 2,564 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 2558 प्राप्त तर सहा अहवाल अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 160 वर गेली आहे. यापैकी सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 34 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 124 असून जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून 2,398 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 77 टक्के जिल्हाधिकारी सिंह

यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीडशेपार असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्के आहे. आतापर्यंत 124 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच, त्यांच्या अगदी निकटचे व कमी संपर्कातील (हाय रिस्क व लो रिस्क) लोकांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. लगेच अशा लोकांना जवळच्या कोव्हीड केअर सेंटर किंवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येते. त्यांचे नमुने तपासणीकरीता तत्काळ प्रयोगशाळेत पाठविले जातात. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले, मात्र कोव्हीडची लक्षणे नाही, अशाही लोकांच्या नमुन्यांची तपासणी केली असता 90 टक्के लोकांना लक्षणे नव्हती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली नाही. या रुग्णांचे उपचार व प्रोटीनयुक्त आहारावर विशेष लक्ष केंद्रित केले. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष आहारतज्ज्ञ नेमण्यात आल्याने जिल्ह्याचा ‘रिकव्हरी रेट’ चांगला राहिला आहे, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details