महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोनने वाढली - yavatmal district corona positive

यवतमाळमध्ये सोमवारी दोन नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात इतकी झाली आहे.

two more corona positive found in yavatmal district total number of active pesant is 7
यवतमाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्येत भर, दोघांना रूग्णालयातून सुट्टी

By

Published : May 19, 2020, 11:40 AM IST

यवतमाळ- जिल्ह्यात मागील आठवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा 98 वरून 7 वर आला. यापैकी आता पुन्हा दोन जण बरे झाले असून त्यांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ ही संख्या पाच वर आली होती; पण यात आणखी दोन नव्या रुग्णांची सोमवारी भर पडली. त्यामुळे पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात इतकी झाली आहे.

मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील 91 आणि आज दोन रुग्ण असे मिळून एकूण 93 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, सोमवारी पुसद आणि दारव्हा येथील दोन जणांचे रिपोर्ट नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही व्यक्ती मुंबईवरून यवतमाळ जिल्ह्यात आले होते. त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरणांतर्गत कोव्हिड केअर सेंटर येथे भरती करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविले असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात आतापर्यंत 1687 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नागरिकांनी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी करण्यात प्रशासनाला आतापर्यंत जे सहकार्य केले, तसेच सहकार्य या टप्प्यातही करावे. नागरिकांच्या सहकार्यानेच कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यात यश येईल. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी. बाहेर निघताना मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले आहे.

हेही वाचा -#CORONA : 21 दिवसानंतर फुलले चेहऱ्यावर हास्य; यवतमाळातील 38 रुग्ण बरे होऊन घरी

हेही वाचा -परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीची टिप्परला धडक; 4 ठार, 22 गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details