यवतमाळ -यवतमाळमध्ये खूणाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत ( Two Murders In Yavatmal ) .नवऱ्यानेच पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना 24 जुलै रोजी दुपारच्या सुमारास नेर कोल्हापूर इथे उघडकीस आली आहे. कमलाबाई मोहन राठोड वय पन्नास वर्ष असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसात सुरू होती. तर दुसरी घटना जन्मदात्या बापाची मुलानेच हत्या केल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील ( yavatmal Digras Taluka ) बेलोरा येथे २३ जुलैच्या सकाळी उघडकीस आली. आईला वडील नेहमी मारहाण करीत होते. त्यामुळेच हत्या केल्याची कबुली संतप्त झालेल्या मुलाने पोलिसांना दिली. शुक्रवारीच मुलाने हत्या केली होती. मात्र शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
वडीलाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार -मृतक गणेश महादेव काशीदकर (वय ६० वर्ष रा.बेलोरा ) याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत नेहमी बायकोला मारहाण ( Drunken husband beaten wife ) करीत होता. एक महिन्यापासून हे कुटुंब चिंचोली येथे वास्तवास आले. परंतु शेती बेलोरा येथे असल्याने मृतक गणेश काशीदकर चिंचोली येथून बेलोरा येत होते. अशातच शुक्रवारी आईला, बापाने मारहाण केली यावरून आरोपी मुलगा वैभव गणेश काशिदकर (वय- ३२) याने रागाच्या भरात वडिलाला संपवायचे या उद्देशाने ट्रकची टायर खोलण्याची लोखंडी रॉड घेऊन शेतात वडिलाला पाहायला गेला. परंतु ते तेथे आढळून आले नाहीत. तेव्हा त्याने थेट बेलोरा येथील घर गाठून खाटेवर झोपलेल्या वडीलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून ठार केले. डोक्यावर इतका जबर मार होता की, डोक्यातून मेंदू पडून होता.