महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये दोन तास मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

यवतमाळमध्ये जुनच्या पहिल्याच आटवड्यात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दोन तास मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण.

Two hours of torrential rain in Yavatmal
यवतमाळमध्ये दोन तास मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

By

Published : Jun 8, 2021, 9:08 PM IST

यवतमाळ - शहरातसह जिल्ह्यात सायंकाळी चारच्या सूमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी आता लागवडीच्या आणि पेरणीच्या कामाला लागणार आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

यवतमाळमध्ये दोन तास मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा
80 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये - कृषी विभागजिल्ह्यातील यवतमाळ शहरासह परिसरातील ग्रामीण भागात मंगळवारी पावसाने अचानक हजेरी लावली. जिल्ह्यातील सोमवारपासून निर्बंध हटविण्यात आल्याने शहरात नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे अचानकपणे आलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याची स्थिती निर्माण झाली होती. शासकीय व बाजारपेठेत कामांसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला मिळेल त्या शेडचा आडोसा घेऊन उभे राहावे लागले. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ झाली. यावेळी पाऊस वेळेवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, चांगला पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी लागवड करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details