यवतमाळयवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सरई येथे पोळ्याच्या दिवशी वाईट प्रसंग घडला. बैल धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला Two Farmers drowned in farm pond आहे. झालेल्या या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत Two Farmers Died In Yawatmal आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील सरई गावातील गजानन राजुरकर वय २५ व रावबा टेकाम वय ४२ पोळ्यानिमित्त शुक्रवारी रोजी दुपारी बैलाला धुण्यासाठी शेततळ्यात गेले होते.
अचानक पाय घसरल्याने शेततळ्यात बुडालेअचानक पाय घसरल्याने ते शेततळ्यात बुडाले. शेततळ्यात खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाय घसरला. गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतर एका शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागला, दुसऱ्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.