यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील येळाबारा येथील धरणावरील धबधब्यावर जीवन पवार (वय 22), तुषार राठोड (वय 21) आणि तुषार पवार (वय 21) हे तिघेजण पोहायला गेले होते. यातील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यातील एकाला वाचविण्यात नागरिकांना यश आले.
धबधब्यावर पोहायला गेलेल्या दोघांचा मृत्यू; घाटंजी तालुक्यातील घटना
हे तिघे पर्यटनासाठी आले असता पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले. पाण्यात बुडत असताना येराबारा येथील मोरेश्वर बारहाते या तरुणाने जीवन पवार याला पाण्यातून बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला.
घाटंजी तालुक्यातील साखरा येथील हे तीनही तरुण दुपारच्या वेळेला येळाबारा येथील वाघाडी धरणामध्ये पोहायला गेले होते. त्यावेळी खोल पाण्याचा त्यांना अदांज आला नाही. यात दोघांचा मृत्यू झाला. एकाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले. हे तिघे पर्यटनासाठी आले असता पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले. पाण्यात बुडत असताना येराबारा येथील मोरेश्वर बारहाते या तरुणाने जीवन पवार याला पाण्यातून बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. तर तुषार राठोड आणि तुषार पवार याला वाचविण्याचा प्रयत्न असफल झाला. दोघेही घाटंजी तालुक्यातील साखरा येथील असून आई-वडिलांचे एकुलते-एक होते. वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे जमादार संतोष ढाखरे आणि शिपाई अक्षय डोंगरे घटनास्थळी दाखल झाले. तृषार राठोड याचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध घेणे चालू आहे.
हेही वाचा -मराठा आरक्षण प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक - अशोक चव्हाण