यवतमाळ - मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू झाले आहे. तुकाराम रामभाऊ उईके (वय 51 वर्षे), विजय रामभाऊ उईके (वय 48 वर्षे, दोघे रा. घाटंजी), भावंडाचे नाव आहे.
31 ऑक्टोबरला दोघेही घाटंजीहून वणी येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरून (एम एच 29 बी के 9102) आले होते. कार्यक्रम आटोपून ते दोघेही दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाले. करणवाडी फाट्यासमोर येताच त्यांचा अपघात झाला. यात एकाच जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान शेवटचा श्वास सोडला.