यवतमाळ-जिल्ह्यातील राळेगाव ते मेटिखेडा मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अविनाश कोवे आणि गौरव मेश्राम असे मृतकाचे नाव आहे. हे दोघेही आपल्या गावी जात होते. त्यादरम्यान हा अपघात झाला.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू; राळेगा-मेटीखेडा रोडवरील घटना
अविनाश कोवे आणि गौरव मेश्राम हे पिपरी (दुर्ग) ला जात होते. त्यादरम्यान समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यात अविनाश कोवे यांचा जागीच मृत्यू झाला व गौरव मेश्राम याना गंभीर दुखापत झाली.
अविनाश कोवे आणि गौरव मेश्राम हे पिपरी (दुर्ग) ला जात होते. त्यादरम्यान समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यात अविनाश कोवे यांचा जागीच मृत्यू झाला व गौरव मेश्राम याना गंभीर दुखापत झाली. गौरव मेश्राम याला तातडीने राळेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीत नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अज्ञात वाहनाबाबत राळेगाव पोलीस तपास करीत आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी