यवतमाळ- रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. ही घटना नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी या ठिकाणी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये योगेश गुप्ता, किशोर कुमार कृष्णाचार्य या दोघांचा समावेश आहे.
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यामुळे झाला कार अपघात; दोन जखमी तर दोघांचा मृत्यू - car accident news pimpalkhuti yavatmal
हैद्राबाद येथील योगेश आणि किशोर हे मित्रांसह आपल्या (टी.एस.१२ इ.सी ९७१९) जॅगूवार गाडीने नागपूरहून हैदराबादकडे जात होते. दरम्यान पिंपळखुटी गावाजवळ रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात त्यांची गाडी आदळल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व गाडीचा अपघात झाला.

हैद्राबाद येथील योगेश आणि किशोर हे मित्रांसह आपल्या (टी.एस.१२ इ.सी ९७१९) जॅगूवार गाडीने नागपूरहून हैदराबादकडे जात होते. दरम्यान पिंपळखुटी गावाजवळ रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात त्यांची गाडी आदळल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व गाडीचा अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की गाडी बाजूला असलेल्या कापसाच्या शेतात जवळपास ५०० मीटर अंतरावर जाऊन आदळली. गाडीतील चालक आणि बाजूच्या सीटवर बसलेल्या दोघांनी सीट बेल्ट लावल्यामुळे ते बचावले. मात्र, मागील सीटवर बसलेल्या योगेश गुप्ता, किशोर कुमार कृष्णाचार्य या दोघांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा-यवतमाळमध्ये ४ जिवंत काडतुसासह रिव्हॉल्व्हर जप्त; कुख्यात गुन्हेगाराला अटक