यवतमाळ - खासगी बस खंडाळा घाटातील दरीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि. 21 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास पुसद ग्रामी पोलीस ठाण्याच्या घडली आहे.
खंडाळा घाटातील दरीत कोसळली खासगी बस, दोघांचा मृत्यू; 18 जखमी - yavatmal latest news
खासगी बस खंडाळा घाटातील दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पुणे येथून यवतमाळकडे महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची (एम एच 29 ए के 8222) बस काल (दि. 20 ऑक्टोबर) सायंकाळी निघाली होती. सकाळी ही बस वाशिमवरून आठ वाजण्याच्या सुमारास यवतमाळला जात असताना पुसदच्या खंडाळा घाटात चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यानंतर ही बस दरीत कोसळली. या बसमधून 30 जण प्रवास करत होते. त्यापैकी विवेक विनोद जाधव (वय 13 वर्षे) यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे तर 18 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पुसद येथली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या अपघाताची नोंद पुसद पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा -यवतमाळ जिल्ह्यात २ हजार किमी पाणंद रस्त्यांसाठी प्रशासनाचा ‘स्पेशल ड्राईव्ह’