महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या खेळाडूच्या गाडीला अपघात; वर्ध्याच्या दोन क्रिकेटपटूंचा अपघाती मृत्यू - नागपूर-तुळजापूर महामार्गावर अपघात

हे खेळाडू यवतमाळला क्रिकेट सामना खेळण्यासाठी आले होते. सामना झाल्यानंतर ते आलेल्या वाहनाने आपल्या पालकांसोबत परत निघाले. दरम्यान, चापडोह पुनर्वसनजवळ त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. अपघातात दोन क्रिकेटपटूंचा  मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जयेश प्रविण लोहिया (वय 10) आणि अक्षद अभिषेक बैद (वय 11), अशी मृतांची नावे आहेत.

acci
अपघातग्रस्त वाहन

By

Published : Dec 29, 2019, 9:27 AM IST

Updated : Dec 29, 2019, 12:40 PM IST

यवतमाळ -क्रिकेट सामना खेळून वर्धा येथे परतणाऱ्या क्रिकेटपटूंच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर-तुळजापूर महामार्गावर घडली आहे. या अपघातात दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जयेश प्रविण लोहिया (वय 10) आणि अक्षद अभिषेक बैद (वय 11), अशी मृतांची नावे आहेत. हे खेळाडू वर्ध्याच्या 'ब्रदरहूड' क्रिकेट क्लबचे होते.

'पद्मविलास क्रिकेट क्लब'ने यवतमाळच्या गोधणी मार्गावर 'टी-ट्वेंटी' सामन्यांचे आयोजन केले होते. हे खेळाडू यवतमाळला क्रिकेट सामना खेळण्यासाठी आले होते. सामना झाल्यानंतर ते आलेल्या वाहनाने आपल्या पालकांसोबत परत निघाले. दरम्यान, चापडोह पुनर्वसनजवळ त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनातील दोन क्रिकेटपटूंचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -पालघरमध्ये दुचाकीला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी

तर, अन्य दोन खेळाडू दर्श सुमित आचलीया (वय ११) आणि रोमित अजय गलांडे (वय ११) तसेच, मृत जयेशचे वडील प्रविण लोहिया आणि अतुल प्रकाश केळकर हे चौघे जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावेळी प्रविण लोहिया वाहन चालवत होते. अपघातापूर्वी पार पडलेल्या सामन्यात मृत जयेश ६ गडी बाद करून 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता.

Last Updated : Dec 29, 2019, 12:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details